वाळू चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:45 IST2020-07-28T22:40:45+5:302020-07-29T00:45:53+5:30
मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील महादेव मंदिराजवळ चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत संशयित भटू बारकू सूर्यवंशी (३५, रा. येसगाव), समाधान विठ्ठल पाटील (३८, रा. मोतीबाग नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू चोरीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
ठळक मुद्देअधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथील महादेव मंदिराजवळ चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत संशयित भटू बारकू सूर्यवंशी (३५, रा. येसगाव), समाधान विठ्ठल पाटील (३८, रा. मोतीबाग नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी ट्रक (क्र. एमएच ४८ टी ९६७९)सह पाच ब्रास वाळू असा १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस मारुती केंद्रे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.