शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डवरून जेष्ठ नागरिकाला नाशिकमध्ये दोन लाख ३९ हजार रुपयांना लावला चूना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:46 IST

एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सुमारे २ लाख ३९ हजार २५० रुपये परस्पर लंपास केले क्रेडीटकार्डशी संलग्न मोबाईलवर ई-मेल

नाशिक : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत असून आॅनलाइनद्वारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एका भामट्याने क्रेडिट कार्डवरून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून सुमारे दोन लाख ३९ हजार २५० रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, चांडकसर्कलवरील उष:काल सोसायटीमधील रहिवासी सुभाष बाबुराव व्यवहारे (६६) यांची अज्ञात भामट्याने लाखो रुपयांची फसवणूक केली. व्यवहारे यांच्या क्रेडीटकार्डशी संलग्न मोबाईलवर भामट्याने ई-मेल करुन त्यांच्या क्रेडिटकार्डवरून सुमारे २ लाख ३९ हजार २५० रुपये परस्पर लंपास केले आहे. याबाबत नाशिक सायबर पोलीस ठाण्यात व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे हे याबाबत अधिक तपास करत आहे. व्यवहारे यांना आलेला मेल, मोबाईल आदिंची पडताळणी करत तांत्रिकदृष्ट्या तपास केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. अज्ञात भामट्यापर्यंत कसे पोहचणे शक्य होईल, यासाठी सायबर टीम प्रयत्न करत आहे.एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. यावरुन सायबर गुन्ह्यांची समस्या गंभीर होत चालल्याने दिसून येते. नागरिकांनी सतर्कत बाळगून सावधगिरीने आॅनलाईन व्यवहार करण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बॅँकेचा खाते क्रमांकाची कोणी अज्ञात व्यक्ती काहीही प्रलोभने किंवा भीती दाखवून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनtheftचोरीPoliceपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय