मेट्रोच्या मंजुरीवरून भाजप सेनेत श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:43+5:302021-02-05T05:41:43+5:30

महापालिकेत गेली चार वर्षे भाजपाची सत्ता असून, आता निवडणुका तोंडावर आल्या असतानाच केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्प मंजूर ...

Credit to BJP Sena for Metro's approval | मेट्रोच्या मंजुरीवरून भाजप सेनेत श्रेयवाद

मेट्रोच्या मंजुरीवरून भाजप सेनेत श्रेयवाद

महापालिकेत गेली चार वर्षे भाजपाची सत्ता असून, आता निवडणुका तोंडावर आल्या असतानाच केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्प मंजूर केला आणि तब्बल २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, त्यामुळे वसंत स्मृती या भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या प्रदेश महामंत्री आमदार देवयानी फरांदे यांनी राज्यातील सत्ता बदलानंतर आलेल्या सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील अनेक कामांना स्थगिती दिली; मात्र त्यानंतरही केंद्र शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली. विरोधी पक्षांनी खुल्या मनाने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मात्र हा शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात केव्हा साकारणार, हे सांगता येणार नाही; परंतु राजकीय श्रेयवाद मात्र आताच सुरू झाला आहे.

छायाचित्र आर फोटोवर ०१ बीजेपी

Web Title: Credit to BJP Sena for Metro's approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.