Creating a free library in every classroom to enhance reading, writing culture | वाचन, लेखन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात मुक्त ग्रंथालयाची निर्मिती

वाचन, लेखन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात मुक्त ग्रंथालयाची निर्मिती

ठळक मुद्देसिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे राबविला उपक्रम

सिन्नर : न्यू इंग्लिश स्कूल दापुर विद्यालय येथे वाचन लेखन संस्कृती वाढवावी यासाठी प्रत्येक वर्गात शुक्रवारी (दि.११) मुक्त ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुक्त ग्रंथालय म्हणजे विद्यार्थ्यांनी-विद्यार्थ्यांसाठी निर्मलेलं छोटसं ग्रंथ भांडार एक प्रकारे मुक्त ज्ञानपिठच. यात बाल ग्रंथपाल म्हणून विद्यार्थ्यांचीच नियुक्ती केलेली आहे. बालग्रंथपाल व सदस्यांनी पुस्तकांची देवाण-घेवाण करायची. आठ दिवसाला एक पुस्तक एका विद्यार्थ्याने घ्यायचे. वाचल्यावर पुस्तकाविषयी माहिती किंवा छोटासा सारांश आपल्या रोजनिशी मध्ये लिहायचा.
मुक्त ग्रंथालयाची सभासद वर्गणी फक्त एक रूपये एक रु पयात भरपूर कथा,कादंबरी, कविता, ललित, सामान्यज्ञान, निबंध पत्र असं समग्र बाल साहित्य मुलांना वाचायला मिळते. सदर उपक्र मातून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता वाढेल तसेच साहित्यिक, कलावंत व एक चांगला माणूस निश्चितच घडेल. असा विश्वास मुख्याध्यापक जी. बी देसाई यांनी व्यक्त केला.
विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी संस्कार भास्कर आव्हाड याने आपल्या वडिलांकडे विद्यालयास आपल्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट देण्याचा हट्ट धरला. त्याच्या पालकाने शामची आई ,अग्निपंख, सामान्यज्ञान, चिंटू, महापुरु षांचे आत्मवृत्त, कथा-कविता इत्यादी १५०० रुपयांची ५० पुस्तके पर्यवेक्षक बी.बी. गुंजाळ, स्थानिक स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन मोहन काकड, भाऊसाहेब कांदे, प्रकाश शिरसाट, ए. बी. सय्यद आदींच्या हस्ते पुस्तके बाल ग्रंथपाल आश्विनी उघडे ,अश्विनी गांडाळ, आबेश शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
(फोटो १२ दापूर)
 

Web Title: Creating a free library in every classroom to enhance reading, writing culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.