आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष तयार करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 00:34 IST2021-04-29T20:40:23+5:302021-04-30T00:34:42+5:30
ठाणापाडा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे झालेल्या बैठकीत हरसूल व ठाणापाडा परिसरातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रोगाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.

आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष तयार करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी
ठाणापाडा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे झालेल्या बैठकीत हरसूल व ठाणापाडा परिसरातील ग्रामीण भागात सध्या कोरोना रोगाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय आश्रमशाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांचे व त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. याच बरोबर त्र्यंबकेश्वर येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व गर्दी होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील रायते, बोरीपाडा, शिरसगाव, ठाणापाडा, देवडोंगरा, अनुदानित आश्रमशाळा ओझरखेड, चिंचवड, मुलवड, खरशेत या सर्व शासकीय आश्रमशाळेत कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष भारती खिरारी आदींनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी पखाने पाटील, गंगाराम लहारे, बळीराम बांगाड, नामदेव महाले, यशवंत महाले आदी उपस्थित होते.