नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:50 IST2019-12-17T01:49:54+5:302019-12-17T01:50:12+5:30
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार
नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकºयांच्या खात्यात दुसºया टप्प्यातील अनुदान जमा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सुधारित मागणीनुसार जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आता केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लक राहणार असून, तेही लवकरच प्राप्त होणार आहे.
आॅक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले तर साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने शासनाला ५७३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु नुकसानीची तीव्रता मोठी असल्याने ५९७ कोटींच्या सुधारित अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १८१ कोटी ५० लाखांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले होते.
शेतीसाठी आठ हजार प्रती हेक्टरी तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत निधीचे वाटप करण्यात आले. सुमारे अडीच लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली.
दुसºया टप्प्यातील सुमारे ३९६ कोटी ६२ लाखांचे अनुदान प्राप्त झाल्याने उर्वरित शेतकºयांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी काहीसा विलंब झाला होता. परंतु आता बाधित शेतकरी आणि पिकांची माहिती हाती असल्याने दुसºया टप्प्यातील अनुदान वाटप सुलभ होणार आहे. त्यामुळे दुसºया टप्प्यातील अनुदान लवकरच शेतकºयांच्या हाती पडणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांच्या स्वाक्षरीनंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
केवळ २० लाखांचे अनुदान शिल्लक
जिल्ह्यातील नुकसानभरपाईसाठी पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर सुधारित मागणी केल्यानुसार आता केवळ १९७८ लाखांचे अनुदान प्राप्त होणे बाकी आहे. दुसºया टप्प्यातील अनुदानाचे वाटप झाल्यानंतर उर्वरित अनुदानही लवकरच जिल्ह्याला प्राप्त होऊन त्याचेही वाटप शेतकºयांना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १८१ आणि दुसºया टप्प्यात ३९६ कोटींचे अनुदान जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्राप्त झाल्याने जिल्ह्याला पुरेपूर अनुदान प्राप्त झाले आहे.
तालुकानिहाय मदतनिधी (लाखात)
मालेगाव ७०२९.६३
बागलाण ४२७४.३७
नांदगाव ३०१८.७७
कळवण १६१२.०३
दिंडोरी २३६४.५१
देवळा १८९०.०२
सुरगाणा १३५१.०६
नाशिक १००९.३६
इगतपुरी ८७७.४९
पेठ ७८९.८३
त्र्यंबकेश्वर ४४२.६०
निफाड ४८६०.०४
चांदवड ३३५३.७३
येवला ३३०५.५३
सिन्नर ३४८३.४५
एकूण ३९६६२.४५