कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:22 IST2020-07-27T15:17:59+5:302020-07-27T15:22:41+5:30

आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळेच असे रुग्ण शोधून काढता यावे, यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांच्या मदतीने महापालिकेच्या वतीने मोबाइल अ‍ॅप विकसित करून लवकरात लवकर उपयोगात आणण्यात येणार आहे.

Create an app to find comorbid patients | कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती

कोमॉर्बिड रुग्णांना शोधण्यासाठी करणार अ‍ॅपची निर्मिती

ठळक मुद्देमृत्युदर कमी करण्यास उपयुक्तकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

नाशिक: आतापर्यंतच्या अहवालांतून बाधित आणि मृत रुग्णांमध्ये कोमॉर्बिड रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त रुग्णांची नोंद असावी आणि त्यांना वेळीच शोधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळेच असे रुग्ण शोधून काढता यावे, यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांच्या मदतीने महापालिकेच्या वतीने मोबाइल अ‍ॅप विकसित करून लवकरात लवकर उपयोगात आणण्यात येणार आहे.
पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने तसेच बेशिस्त नागरिकांच्या गर्दीतून शहरात मोठ्या प्रमाणावर रु ग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विविध आजारांनी त्रस्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक मोबाइल अ‍ॅप डेव्हलप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक आयटी कंपन्यांची मदत घेण्यात येत आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कोमॉर्बिडीटी सर्व्हे करता येणार असून, रिअल टाइम डाटादेखील मिळण्यास मदत होऊ शकणार आहे. त्यामुळे मनपाचे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी तत्काळ तिथे मदत पोहोचवू शकणार आहेत. कुठल्याही कंटेन्मेंट क्षेत्रामधील रु ग्णात मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर किडनीसारख्या बाधित कोमॉर्बिड रुग्णांसाठी अँटिजेन टेस्टच्या पर्यायाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच अशा रुग्णांना इम्युनिटी बुस्ट औषधांचे वाटप करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोमॉर्बिड रुग्णांना अधिकाधिक जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांचा शोध घेऊन त्यांना अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन या प्रस्तावित अ‍ॅपच्या मदतीने शक्य होणार आहे.
नाशिक शहरात कोरोना रु ग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने रु ग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण शहरात आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, श्वसनाशी निगडीत जुने आजार, अस्थमा, दमा, किडनीसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा तपास केला जाणार आहे . कोमॉर्बिड रु ग्णाबाबत अधिक दक्षता तसेच शहरासह जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी या उपकरणाचा फायदा होऊ शकणार आहे. अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून सर्व आरोग्य यंत्रणांना देण्यात आले आहेत.

Web Title: Create an app to find comorbid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.