खोरीपाडा येथे बिबट्याकडून गायी, सात शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 00:38 IST2019-12-26T00:36:35+5:302019-12-26T00:38:34+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे बुधवारी बिबट्याने सात बकऱ्या व दोन गायी फस्त केल्या. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

The cows, seven goats, lost their lives in Khoraipada | खोरीपाडा येथे बिबट्याकडून गायी, सात शेळ्या फस्त

खोरीपाडा येथे बिबट्याकडून गायी, सात शेळ्या फस्त

ठळक मुद्दे खोरीपाडा येथे बुधवारी बिबट्याने सात बकऱ्या व दोन गायी फस्त केल्या. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे बुधवारी बिबट्याने सात बकऱ्या व दोन गायी फस्त केल्या. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील खोरीपाडा गावाच्या पूर्वेला तवल्या डोंगराशेजारी हिरामन तुकाराम खांडवी यांच्या गट नं २१ खोरीपाडा या शिवारातील दोन गायी बांधावर बांधलेल्या होत्या. बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. गायींना कुपात ओढत नेऊन फस्त केल्या. खोरीपाडा येथील जयराम यशवंत राऊत यांच्या गट नंबर दहा शेताच्या बांधावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर हल्ला करत सात शेळ्या फस्त केल्या. खोरीपाडा परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: The cows, seven goats, lost their lives in Khoraipada