पंचवटी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गंगाघाटावरील गौरी पटांगणावर आदिवासी खेड्यापाड्यातून गौरी विक्रेते आदिवासीबांधव दाखल झालेले आहेत. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, वणी, करंजाळी या आदिवासी खेड्यापाड्यातून आदिवासीबांधव थापलेल्या तसेच रानावनातून वेचलेल्या रानशेणी गोवºया विक्रीसाठी आणतात.गौरी पटांगणावर गोवºया विक्रेते दाखल झाले असून, रानशेणी गोवºया ५०० रुपये पोते, तर २० रुपये वाटा याप्रमाणे विक्री केल्या जात आहेत, तर हाताने थापलेल्या गोवºया ५०० रुपये शेकडा दराने विक्री केले जात आहे़विविध मित्रमंडळांच्या कार्यकर्त्यांनी गंगाघाटावर येऊन गोवºया खरेदीस सुरुवात केली आहे.
गोदाघाटावर गोवऱ्या दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:08 IST