कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या

By Admin | Updated: June 1, 2017 01:23 IST2017-06-01T01:15:44+5:302017-06-01T01:23:32+5:30

पेठ : गुजरात राज्यातून कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पेठ पोलिसांनी पकडल्याने त्यात तीन गायी व एक वासरू कोंबून ठेवल्याचे आढळून आले.

Cows caught for slaughter | कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या

कत्तलीसाठी नेणाऱ्या गायी पकडल्या

 लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गुजरात राज्यातून चोरट्या मार्गाने कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन पेठ पोलिसांनी पकडल्याने त्यात तीन गायी व एक वासरू दाटीवाटीने कोंबून ठेवल्याचे आढळून आले.
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात जाणारा छोटा हत्ती ट्रक (क्र. एमएच १५ एफ ०५१३) पेठ पोलिसांना संशय आल्याने तपासणीसाठी थांबविला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने तीन जर्सी जातीच्या गायी व एक वासरू कोंबलेले आढळून आले. सदरचे वाहन पेठ-जागमोडी रस्त्यावरील संगमेश्वर मंदिराजवळ पकडण्यात आले. यावेळी गोरक्षा समिती व बजरंग दलाचे कार्यकर्तेही घटनास्थळी जमा झाले. जनावरे व वाहन मिळून तीन लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोठुळे, उगले पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Cows caught for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.