सिडकोत वृृद्धाला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:18+5:302021-08-28T04:19:18+5:30
कोरोना महामारीला प्रतिबंध बसावा, यासाठी जानेवारी महिन्यापासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता मिळाल्याने सर्वत्र लसीकरण सुरू आहे. ...

सिडकोत वृृद्धाला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनही
कोरोना महामारीला प्रतिबंध बसावा, यासाठी जानेवारी महिन्यापासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता मिळाल्याने सर्वत्र लसीकरण सुरू आहे. त्यासाठी महापालिकेचे आजमितीस शहरात १४३ इतके लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तर २७ खासगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्र आहे. महापालिकेच्या अचानक चौक येथील एका लसीकरण केंद्रावर शिवाजी चौक येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश चव्हाण (वय ६९) यांनी १८ एप्रिल रोजी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ८४ दिवसांनी दुसरा डोस घेण्याबाबतच्या नवीन नियमामुळे ते दुसरा डोस घेण्यासाठी सिडकोतील आधीच्याच लसीकरण केंद्रावर (दि. २३ ) गेले. त्यावेळी त्यांच्या आधारकार्डची मागणी करण्यात आली. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना डोसही देण्यात आला. यानंतर लसीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रक्रिया केली असता, दुसरा डोस कोविशिल्डऐवजी कोव्हॅक्सिनचा दिल्याची बाब निदर्शनास आली. संबंधित दुसऱ्या डोसच्या प्रमाणपत्रावर मात्र डोस एक अशी नोंद आली आहे. यामुळे तांत्रिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय लसीकरण केंद्रांवर संबंधित कर्मचारी योग्य ती खात्री करीत नसल्याची बाबही यानिमित्ताने समोर आली आहे.
कोट===
मनपा कर्मचाऱ्यांनी नागरिकांना लस देताना योग्य ती खात्री करूनच डोस देणे आवश्यक आहे. वडिलांना लस देताना मी कर्मचाऱ्यास दुसरा डोस असल्याचे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
- अमित चव्हाण, शिवाजी चौक