मानोरी येथे कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:29 IST2021-07-19T23:37:29+5:302021-07-20T00:29:48+5:30
मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले.

मानोरी बु. येथे लसीकरण करून घेताना नागरिक.
मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले.
लसीकरण सुरू झाल्यापासून मानोरी बु. येथील नागरिकांना लसीकरणासाठी मुखेड येथे भल्या पहाटे नंबर लावण्यासाठी जावा लागत होते. मानोरी बु येथील ग्रामपंचायतीने लसीकरणासाठी येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
गायकवाड यांनी या पत्राची दखल घेत तालुका आरोग्य केंद्राला मानोरी येथे लसीकरण घेण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी सरपंच नंदाराम शेळके, नितीन शेळके, सदस्य रेखा शेळके तसेच लसीकरणासाठी मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक नितीन व्यवहारे, दीपक रेहरे, गट प्रवर्तक मनीषा राजगुरु, जे. डी. वळवी, समुदाय आरोग्य अधिकारी ज्योती वाघ, पूजा मेहर, आशासेविका सुवर्णा भवर, शोभा भालके, मंदा वाघ आदींनी सहकार्य केले.
येवला तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी नागरिकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने सध्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात असल्याने अद्यापही पहिल्या लसीकरणासाठी नागरिकांची मागणी वाढत चालली आहे. तरी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणाचा साठा उपलब्ध करून पहिल्या लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांना लसीकरण वाढवून द्यावे.
- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती.