माजी मनपा आयुक्त खंदारे यांना न्यायालयाचे समन्स
By Admin | Updated: September 2, 2015 23:43 IST2015-09-02T23:42:15+5:302015-09-02T23:43:03+5:30
माजी मनपा आयुक्त खंदारे यांना न्यायालयाचे समन्स

माजी मनपा आयुक्त खंदारे यांना न्यायालयाचे समन्स
नाशिक : रविवार कारंजावरील मिळकतीवर महापालिकेने टाकलेले आरक्षण न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून रद्द केले असतानाही मिळकतधारकाला संबंधित मिळकतीवर आरक्षण असल्याचे सांगून बांधकामाची परवानगी नाकारल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त संजय खंदारे, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे व उपअभियंता दौलतराव घुले यांना जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले असून १० सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत़ मिळकतधारक उत्तम अंबादास राय (कलाल) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़
रविवार कारंजावरील सर्व्हे नंबर ३४,३५ प्लॉट नंबर २९ व ३० या मिळकतीच्या मूळ मालकांनी उत्तम राय यांच्यासोबत विकसन करारनामा केला आहे़ या जागेवर महापालिकेने आरक्षण असल्याची नोटीस राय यांना पाठविली होती़ सदर जागा मनपाने ताब्यात घेऊन त्याचा मोबदला द्यावा अशी मागणी राय यांनी केली; मात्र मनपाने ना जागा ताब्यात घेतली ना मोबदला दिला़ न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर मनपाचे आरक्षण बेकायदेशीर ठरवून न्यायालयाने त्यास स्थगिती आदेश दिला़
यानंतर राय यांनी जागेवर बांधकाम करण्याबाबत महापालिकेकडे आराखडा मंजुरीसाठी पाठविला असता या जागेवर पुन्हा आरक्षण असल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान तसेच तक्रारदारास त्रास देत असल्याच्या कारणावरून राय यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली़ त्यावर न्यायालयाने माजी मनपा आयुक्त संजय खंदारे, नगररचना विभागाचे अभियंता संजय घुगे व दौलतराव घुले यांना समन्स काढले असून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ (प्रतिनिधी)