शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधील महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणं अंगलट; कर्मचाऱ्याला कोर्टाने सुनावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:21 IST

आरोपीने पीडित फिर्यादी महिलेसोबत संवाद साधताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

Nashik Crime: नाशिक शहरातील एका शासकीय कार्यालयात एकत्रित नोकरीवर असताना तत्कालीन वरिष्ठ लिपिक आरोपी महेंद्र पवार याने सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत संवाद साधल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नदीम पटेल यांनी त्यास दोषी धरले. सोमवारी तीन महिन्यांचा साधा कारावास व एक हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली.

शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावत असताना ३० डिसेंबर २०१२ साली पवार याने पीडित फिर्यादी महिलेसोबत संवाद साधताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. दरम्यान, पीडिता प्रसूती रजेवर असतानाही संबंधिताने वारंवार फोन करत 'तुझ्या टेबलचे काम पूर्ण कर...' याबाबत सांगून त्रास दिला होता. याबाबतची तक्रार त्यांनी कार्यालय अधीक्षकांकडे केली. तसेच महासंचालक कार्यालयाकडेही ई-मेलद्वारे तक्रार केली होती. यानंतर विभागीय चौकशी पवार यांची करण्यात आली. तसेच दोघांना समक्ष बोलावून महिला तक्रार निवारण समितीपुढेही चौकशी करण्यात आली.

२०१३ मध्ये दाखल झाला होता गुन्हा..टेबल बदलण्याबाबतचा आदेश पाठवला असता तो आदेशदेखील पवार याने दाबून ठेवला होता. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी या आदेशाची प्रत मिळवली. त्यानंतर महासंचालकांच्या आदेशाने पीडितेने पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार अर्ज केला. तेथे त्यांना व पवार यांना बोलावून घेत चौकशीही करण्यात आली. यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०१३ साली फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाकडून अॅड. सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद करत सात साक्षीदार तपासले.

दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपी महेंद्र पवार यास दोषी धरले. दंडाची रक्कम न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी