अज्ञात वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:08 IST2020-12-10T00:07:41+5:302020-12-10T00:08:05+5:30
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर हॉटेल साईजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दांपत्य जखमी
ठळक मुद्देमुंबई-आग्रा रोडवरील साई हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने धडक
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर हॉटेल साईजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले.
कोटमगाव, ता. निफाड येथून नातेवाइकाचा दशक्रिया विधी आटोपून शंकर अर्जुन काळे (७०), मंदाबाई शंकर काळे (६४) हे टीव्हीएस लुना गाडीवरून (क्र.एमएच ४१/ २७२४) उमराणे (ता. देवळा) येथे जात होते. मुंबई-आग्रा रोडवरील साई हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. सोमा टोल कंपनीच्या रुग्णवाहिकेतून दोघांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.