शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले दाम्पत्य, दागिन्यांसह रोकड चोरीला; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:10 IST

दुपारच्या सुमारास दाम्पत्य तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.

सिन्नर : समृद्धी महामार्गाने प्रवास करत असताना खंबाळे शिवारातील हॉटेलमध्ये जेवणासाठी दिल्लीचे दाम्पत्य थांबले होते. त्यांचे ५ लाखांचे हिऱ्यांचे दागिने व रोकड चोरणाऱ्यास वावी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. चोरट्याकडून पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयिताला अटक केली आहे.

दिल्ली येथील व्यापारी असलेले कमल रतनलाल अग्रवाल हे त्यांच्या पत्नी व इतर नातेवाइकांसोबत महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. सोमवारी  ते छत्रपती संभाजीनगर येथून ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गाने नाशिककडे येत होते. दुपारच्या सुमारास ते तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी अग्रवाल यांच्या पत्नीने रोख रक्कम व दागिने असलेली पर्स जेवताना टेबलच्या खाली ठेवली होती. मात्र, जेवण झाल्यानंतर ते पर्स न घेताच तेथून नाशिककडे निघून गेले. नाशिक येथे पोहचल्यानंतर त्यांना पर्स नसल्याचे निदर्शनास आले.

कामगारांची कसून चौकशी 

ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांनी पथक तयार करून गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने हॉटेलमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तेथील सर्व कामगारांची कसून चौकशी केली. तपासाअंती सदर चोरी हॉटेलचा कॅशिअर रवि राज रेड्डी (४०, मृळ रा. नागपूर) याने ही चोरी केल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हॉटेलमध्येच एका खोलीत लपवून ठेवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

असा होता मुद्देमाल 

पर्समध्ये ७५ हजारांची रोकड, १ लाख ५० हजार रुपये किमतीची व २ लाखांची अशा दोन हिन्ऱ्यांच्या अंगठ्या, ६० हजारांचे दोन टीसॉट कंपनीचे लेडीज घड्याळे असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. अग्रवाल यांनी वावी पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातकाल पाउले उचलुन सुत्रे फिरवली. गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.

कामगिरीचे कौतुक 

अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कारवाई उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार सतीश बैरागी, अजय महाजन, साहेबराव बलसाने, शहाजी शिंदे, बाबासाहेब शिंदे, सचिन कहाणे, कैलास गोरे, देविदास माळी, नवनाथ आडके, विक्रम लगड, तुषार दयाळ यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय कोठावळे करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी