कोतवाल पदासाठीच्या आरक्षण सोडत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 22:00 IST2016-03-16T21:57:31+5:302016-03-16T22:00:19+5:30
कोतवाल पदासाठीच्या आरक्षण सोडत जाहीर

कोतवाल पदासाठीच्या आरक्षण सोडत जाहीर
देवळा : तालुक्यातील रिक्त कोतवाल पदासाठीच्या चार गावांतील आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आली.
रामेश्वर येथे अनुसूचित जातीच्या महिलेचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले, तर लोहोणेर, कनकापूर या दोन गावांसाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण शासनाच्या नियमानुसार जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर काढण्यात आले. महालपाटणे येथे भटक्या विमुक्त जमातीकरिता राखीव झाले.
सदर सोडत गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी करण शरद महिरे याच्या हातून काढण्यात आली. त्याने काढलेली चिठ्ठी अनुसूचित जमातीच्या महिला गटाकरिता रामेश्वर गावाची निघाली. यावेळी तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी सी. एल. पवार, पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, भूमिअभिलेख उपअधीक्षक गवळी, तलाठी श्रीमती साळवे आदि उपस्थित होते.