सायने शिवारात कापसाच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:54 IST2020-02-13T23:48:17+5:302020-02-14T00:54:52+5:30
शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली नसून नुकसानीचा निश्चित आकडा उशिरापर्यंत कळू शकला नाही.

सायने बुद्रुक शिवारात कापसाच्या गंजीला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
मालेगाव मध्य : शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली नसून नुकसानीचा निश्चित आकडा उशिरापर्यंत कळू शकला नाही.
सायने ब्रदुक आद्योगिक वसाहत येथील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीत फेडरेशनद्वारा शेतकऱ्यांकडून कपाशी खरेदी केली जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली १३ हजार ५०० क्विंटल कपाशीचा साठा करण्यात आला होता.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या आवारातील साठवणूक करण्यात आलेल्या कपाशीच्या गंजीला अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बंबाच्या सहाय्याने १४ फेºया करीत आगीवर नियंत्रण मिळविले.