नामपूरला शेतात पडला गारांचा खच

By Admin | Updated: May 1, 2017 00:08 IST2017-05-01T00:08:23+5:302017-05-01T00:08:55+5:30

नामपुर : मोसम खोऱ्यात बऱ्याचशा भागाला अवकाळी पावसाने गारांसह झोडपून काढले.

The cost of hail fell in the field of Nampur | नामपूरला शेतात पडला गारांचा खच

नामपूरला शेतात पडला गारांचा खच

नामपुर : मोसम खोऱ्यात बऱ्याचशा भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू आदींसह रब्बीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
दुपारपर्यंत परिसरात कडक ऊन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाडा होत होता. दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन ढगानी गर्दी केलीे. अचानक दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरु वात झाली. मोसम परिसरातील बऱ्याचशा भागात गारांचा पाऊस झाल्याने शेती व्यवसायचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक शेतकर्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्यां प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन्वेळी आलेल्या पावसाने शेतात साठवून ठेवलेला कांदा झाकन्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरु होती. दाट लग्नितथ असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पावसाने असह्य उकाडयापासून नागरिकांची सुटका झाली असून परिसरात सुखद गारवा पसरला आहे. पावसामुळे काहिकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. वीजपुरवठ्याअभावी कामे रखडले होते. (वार्ताहर)

Web Title: The cost of hail fell in the field of Nampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.