शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्च सादर न करणे पडले महागात

By admin | Updated: February 1, 2016 22:00 IST

कारवाई : सिन्नर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ३५४ उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटिसा

सिन्नर : ग्रामपंचायत निवडणुका पार पडून आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ३५४ उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात अनेक ग्रामपंचायत सदस्यांसह पराभूत उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनाही निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना त्यांनी खर्च सादर केला नसल्याचे दिसून येते. बिनविरोध, विजयी व पराभूत अशा ३५४ उमेदवारांना खर्च सादर न केल्याने कारवाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात एप्रिल महिन्यात ९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. सरदवाडी, आटकवडे, मऱ्हळ खुर्द, धुळवड, पिंपळगाव, श्रीरामपूर, धोंडबार, खंबाळे, पाटोळे, चापडगाव, दहीवाडी, रामपूर, ब्राह्मणवाडे, धोंडवीरनगर, रामनगर, वडगाव-सिन्नर, निमगाव-देवपूर व दातली या १८ ग्रामपंचायतींसाठी १४७ सदस्य बिनविरोध निवडून गेले होते. उर्वरित ८० ग्रामपंचायतींच्या ५७० सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. २२ एप्रिल २०१५ रोजी मतदान पार पडले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली होती. मतमोजणीनंतर पराभूत व विजयी अशा सर्व उमेदवारांना ३० दिवसांच्या आत विहित नमुन्यात शपथपत्रासह निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. मात्र एकूण उमेदवार व बिनविरोध निवडणूक आलेल्या सदस्य अशा ३५४ उमेदवारांनी अद्यापपर्यंत निवडणूक खर्च सादर केले नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने ३५४ उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. (वार्ताहर)