शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी महापालिकेच्या जागेवर नजर ठेवू नये : रतन लथ

By संजय पाठक | Updated: May 11, 2019 19:01 IST

नाशिक -  महापालिकेच्या ताब्यातील खुल्या जागांवर अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा यासह अन्य संस्थांच्या माध्यमातून चालवत असते. अर्थातच ही मंडळे आणि संस्था राजकिय पक्ष, नगरसेवक यांच्याशी संबंधीत आहेत. तथापि, सामाजिक उपक्रमात गैरव्यवहार सुरू झाले आहे. काही ठिकाणी व्यावसायिक वापर सुरू आहे तर काही जागा या खासगी मिळकती म्हणून वापरल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता रतन लथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. त्याआधारे महापालिकेने कारवाई देखील सुरू केली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांकडून मनपाच्या मिळकतींचा खासगी वापरनाशिककरांच्या हक्कावर गदामहापालिकेने आॅडीट करावे हीच मागणी

नाशिक महापालिकेच्या ताब्यातील खुल्या जागांवर अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा यासह अन्य संस्थांच्या माध्यमातून चालवत असते. अर्थातच ही मंडळे आणि संस्था राजकिय पक्ष, नगरसेवक यांच्याशी संबंधीत आहेत. तथापि, सामाजिक उपक्रमात गैरव्यवहार सुरू झाले आहे. काही ठिकाणी व्यावसायिक वापर सुरू आहे तर काही जागा या खासगी मिळकती म्हणून वापरल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता रतन लथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. त्याआधारे महापालिकेने कारवाई देखील सुरू केली आहे. मुळात जनहित याचिका का दाखल करावी लागली, याबाबत लथ यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न: महापालिकेच्या मिळकतींबाबत जनहित याचिका का दाखल करावी लागली?लथ: महापालिकेच्या अधिनियमानुसार कोणत्याही गृहनिर्माण संस्थेचे बांधकाम करताना त्या सोसायटीसाठी मोकळी जागा ही खुली जागा म्हणून राखीव असते. स्थानिक रहिवाशांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी ती आवश्यक असते. मात्र महापालिकेकडून या जागा घेऊन त्यावर नगरसेवक त्यावर चॅरीटी केल्याचे दाखवतात. त्यांनी समाज कार्य जरूर करावे परंतु महापालिकेच्या मिळकतींवर डोळा ठेवून महापालिकेच्या जीवावर समाज कार्य कशाला करायचे? नगरसेवकांनी सेवाभावी उपक्रम जरूर राबवावेत परंतु ते त्यांच्या खर्चाने राबवावेत. त्याच प्रमाणे मोकळे भूखंड हे मोकळेच राहावे स्थानिक नागरीकांना त्याचा वापर करता यावा ही अपेक्षा आहे.

प्रश्न: जनहित याचिकेसाठी कोणती तयारी केली?लथ : आता पूर्वीसारखा काळ राहीलेला नाही. कोणीतरी स्वार्थाने जनहित याचिका दाखल करतात आणि मग यंत्रणा किंवा संबंधीतांना ब्लॅकमेल करून ती याचिका मागे घेतात. तसे दिवस आता राहीलेले नाहीत. सर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात विविध प्रकारचे आदेश दिले आहेत न्यायालयात याचिका दाखल केली की, त्या अनुषंघाने साक्षी पुरावे येतातच. मी जर आरोप करीत असेल तर माझ्याकडे त्यासाठीचे पुरावे हवेत. त्यामुळे मी महापालिकेकडून माहितीच्या अधिकारात अनेक प्रकारची माहिती मागितली आणि माझी यंत्रणा वापरून प्रसंगी स्टींग आॅपरेशन करून प्रत्यक्षात काय चालते याचे पुरावे जमा केले. मग याचिका दाखल केली.प्रश्न: तुमच्या मिळकत तपासणीत काय आढळले?लथ : खुल्या जागेत दहा टक्के क्षेत्रात बांधकाम करणे आवश्यक असताना संबंधीतांनी २५ टक्कयांपर्यंत बांधकाम केले, जे अनाधिकृत आहे. काही नगरसेवकांनी महापालिकेच्या मिळकतींचा खासगी वापर सुरू केला आहे. उद्यानालगत स्वत:चे घर असेल तर ते खासगी उद्यान म्हणून वापरतात. मनपाच्या मिळकतींचा गोदाम म्हणून वापर करतात. हे चुकीचे आहे. शहरातील गोरगरीब विक्रेत्यांच्या झोपडट्या महापालिका हटवते. टपऱ्या उचलते, मग आपल्या मिळकतीतील बेकायदेशीर बांधकाम का हटवत नाही हा खरा प्रश्न आहे. महापालिकेच्या मिळकती या नाशिककरांच्या आहेत. त्यावर बांधकामावर खर्च झालेला पैसा नागरीकांचा आहे. त्यामुळे ही नाशिककरांच्या वतीने दाखल केलेली याचिका आहे.प्रश्न: जनहित याचिकेत तुमची नेमकी मागणी काय आहे ?लथ : महापालिकेच्या मिळकती त्यांनी स्वत: संरक्षीत केल्या पाहिजेत. त्याचा दुरूपयोग होता कामा नये तसेच त्या महापालिकेने मिळकतींचा वापर कसा होतो याचे आॅडीट केले पाहिजे. ज्या संस्था चांगल्या पध्दतीने आणि कायदेशीर बाबी पडताळून काम करीत आहेत त्यांना माझा विरोध नाही आणि जे कायद्याने काम कामकरीत आहेत, त्यांना मुळातच घाबरण्याचे कारण नाही.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHigh Courtउच्च न्यायालय