निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:57 IST2018-02-28T00:57:38+5:302018-02-28T00:57:38+5:30
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे येथील यादव कुटुंबातील सूनबाई गुजरात राज्यातील विजलपूर (नवसारी) येथे नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.

निºहाळे येथील सूनबाई नवसारीच्या नगरसेवक
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे येथील यादव कुटुंबातील सूनबाई गुजरात राज्यातील विजलपूर (नवसारी) येथे नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. येथील युवक विजय शंकर यादव हे १९९३ साली नोकरीसाठी गुजरात राज्यातील डायमन कारखान्यात विजलपूर (नवसारी) येथे गेले. चांगल्या स्वभावामुळे त्यांनी या परिसरात मोठा जनसंपर्क प्रस्तापित केला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत घरातील केवळ सहा मते असताना त्यांच्या पत्नी कल्पना विजय यादव या राष्टÑीय कॉँग्रेस पक्षाकडून विजयी झाल्या. त्यांनी भाजपाचा उमेदवाराचा पराभव केला. या विजयाबद्दल निºहाळे येथे त्यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.