महामंडळांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:27 IST2020-01-11T23:54:30+5:302020-01-12T01:27:15+5:30

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

Corporations demand for waiver of corporations | महामंडळांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करताना प्रकाश लोंढे, संजय भालेराव, दिलीप दासवाणी आदींसह कार्यकर्ते.

ठळक मुद्देरिपाइंचे आंदोलन । कर्जमाफीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन

नाशिकरोड : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, चुंचाळे शिवार येथील घरकुल योजनेतील वंचितांना त्वरित घरकुल मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, प्रियकीर्ती त्रिभुवन, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, भीमराव धिवरे, दिलीप दासवाणी, पवन क्षीरसागर, सनी वाघ, संजय भालेराव, विश्वनाथ काळे, प्रमोद बागुल आदी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील घोषित अघोषित अनेक झोपडपट्टीतील घरांना घरपट्टीसह, सर्व्हिस चार्जेस लागू झालेले नाही ते त्वरित लागू करावे, सर्व प्रकारच्या शासकीय व निमशासकीय कार्यालय व खासगी उद्योगामध्ये रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी प्राधान्य देऊन स्थानिक भूमिपुत्रालाच रोजगार मिळावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Corporations demand for waiver of corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप