CoronaVirus News: नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूने अख्खे गाव झाले क्वॉरंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 02:59 IST2020-06-20T02:58:47+5:302020-06-20T02:59:01+5:30
ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावावर क्वॉरंटाइन होण्याची वेळ

CoronaVirus News: नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूने अख्खे गाव झाले क्वॉरंटाइन
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात गरज म्हणून घराकडे पायी निघालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविणाऱ्या बागलाण तालुक्यातील एक युवकच बाधित झाला. परंतु लक्षणे निदर्शनास न आल्याने त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाही, दुर्दैवावे त्याचा कोरोनाने बळी घेतला. मात्र ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावालाच क्वॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे.
सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक बाधितांची संख्या जायखेड्यात आहे. तरूणाच्या मृत्यूनंतर तपासणीत ५५ व्यक्ती बाधित आढळल्याने प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रुग्णाच्या घरापासून शंभर मीटरपर्यंत कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्याने अख्खे गावच क्वॉरंटाइन झाले आहे. वाहनचालक असलेल्या येथील तरुणाने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मूळ गावी पोहोचविण्याचे काम केले. मात्र तो स्वत:च कोरोनाच्या विळख्यात सापडला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ७४ वैद्यकीय पथकांमार्फत प्रत्येकाची घरोघरी जाऊन तपासणी केली जात असून, शुक्रवारपर्यंत साडेचार हजार नागरिकांची तपासणी झाली.