CoronaVirus Lockdown News: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी नाशकात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:36 IST2021-05-10T15:33:20+5:302021-05-10T15:36:33+5:30
CoronaVirus News: १२ ते २२ मे दरम्यान नाशकात कडक लॉकडाऊन; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निर्णय

CoronaVirus Lockdown News: कोरोनाचा कहर रोखण्यासाठी नाशकात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन
नाशिक- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने येत्या १२ ते २२ मे असे दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केवळ वैद्यकीय कारणांसाठीच बाहेर पडता येणार आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर जाणवला. पॉझिटिव्हीटी रेटदेखील चाळीस टक्यांवर गेला होता. आता तो २६ ते २८ टक्क्यांवर आला असला तरी रूग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. राज्य शासनाने ५ एप्रिल पासून निर्बंध लागू केले. त्यानंतर २२ एप्रिल पासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. परंतु रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सर्व मुद्यांवर चर्चा करून १२ ते २२ कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये खासगी आस्थापनेदेखील बंद ठेवण्यात येतील. सकाळच्या वेळी म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत किराणा आणि अन्य अत्यावश्य्क सुविधांचीच दुकाने खुली ठेवण्यास परवानगी असली तरी सर्व प्रकारचे बाजार देखील बंद असतील. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही.