CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी नाशिक वनविभाग देणार योगदान, वनक्षेत्रपाल संघटना सरसावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:24 PM2020-04-01T12:24:12+5:302020-04-01T13:22:18+5:30

CoronaVirus : महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व वनक्षेत्रपाल करोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन दिवसांचा पगार जमा करणार आहेत.

CoronaVirus: Nashik Forest Department contributes to fight Corona | CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी नाशिक वनविभाग देणार योगदान, वनक्षेत्रपाल संघटना सरसावली 

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी नाशिक वनविभाग देणार योगदान, वनक्षेत्रपाल संघटना सरसावली 

Next

नाशिक : वनवृत्तील उपवनसंरक्षकांसह सर्व वनक्षेत्रपाल दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहे, जेणेकरून राज्य सरकारला कोरोनाशी सामना करण्यासाठी बळ मिळेल. राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ नये म्हणून वनविभाग सर्वतोपरी अर्थसहाय्य करणार असल्याची माहिती नाशिक चे प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

महाराष्ट्र रेंजर्स असोसिएशनच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व वनक्षेत्रपाल करोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन दिवसांचा पगार जमा करणार आहेत. शासकीय पातळीवर मार्च महिन्यातील दोन दिवसांचा पगार थेट वळता करण्यासंदर्भात मागणी करण्याचे पत्र  प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे.

नाशिकमधील वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल (रेंजर)  सहाय्यक वनसंरक्षक ते वनसंरक्षक पदापर्यंतचे सर्व अधिकारी अर्थसहाय्य करणार आहेत. याबाबत प्रभारी मुख्य वनसंरक्षकांनी सूचना दिल्या आहेत. वनपाल युनियनने देखील यास पाठिंबा दर्शविला आहे.  राज्यातील ९५० वनक्षेत्रपाल मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दोन दिवसांचे वेतन देणार आहोत. यासंदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्र पाठविले आहे. नाशिक वनवृत्तातील ७६ वनक्षेत्रपालांसह इतर वन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे  अमोल आडे, अध्यक्ष, फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन, नाशिक वनवृत्त यांनी सांगितले.

प्रादेशिक ३५, सामाजिक वनीकरण ३०, वन्यजीव  ३, फिरते पथक  ४ आणि मालेगाव उपविभागात ४ असे ७६ वनक्षेत्रपाल सहाय्य करणार आहेत.  राज्यातील करोनाच्या संकटाचे लवकरात लवकर निवारण व्हावे, यासाठी कोणत्याही स्वरुपात अर्थसहाय्याची निकड भासू नये, म्हणून संपूर्ण वनविभागाने पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली. सर्वांच्या पगारातून नाशिक वनवृत्तातून अंदाजे ४० लाखांपर्यंचा निधी संकलित होण्याची शक्यता असल्याचे ननाशीचे वनक्षेत्रपाल रवींद्र भोगे यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: Nashik Forest Department contributes to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक