पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:58 IST2020-06-10T21:34:23+5:302020-06-11T00:58:50+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाथरे खुर्दचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पाथरे खुर्द येथील ७६ वर्षीय पुरुष आपल्या शस्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाला होता.

पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील वृद्धास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पाथरे खुर्दचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पाथरे खुर्द येथील ७६ वर्षीय पुरुष आपल्या शस्रक्रियेसाठी कोपरगाव येथील दवाखान्यात दाखल झाला होता. कोरोनाची लक्षणे आढळल्याने याकाळातच खासगी लॅबने कोविडची तपासणी केल्याने सदर व्यक्ती पॉझिटीव् असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीला नाशिक येथे पुढील तपासणी आणि उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या व्यक्तीच्या सहवातील हायरिस्कमधील चार जणांना सिन्नर येथे हलविण्यात आले असून, इतर १६ जणांना होम कॉरण्टाइन करण्यात आले आहे. पाथरे खुर्द येथील परिसर जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना भेटून आरोग्य विभागाने चौकशी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वावी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य, वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पाथरे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका गायत्री मगर, खुर्दच्या सरपंच कविता गुंजाळ, उपसरपंच सुकदेव गुंजाळ, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी, बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, माजी सरपंच मच्ंिछद्र चिने, ग्रामसेवक नितीन मेहेरखांब, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी सदरच्या कुटुंबातील सदस्यांची, आजूबाजूच्या व्यक्तींची चौकशी केली.
-----------------
येथील बुधवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच गावातील व्यवहार चार दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. कोणीही बिगरमास्कचे गावात फिरणार नाही तसेच उगाचच गावात गर्दी करणार नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाथरेत या अगोदरही दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ते दोन्हीही रुग्ण निगेटिव्ह झाल्याने पाथरेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता; पण आता पुन्हा रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.