Coronavirus: मालेगाव येथे आणखी 5 जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण 115 कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 11:04 IST2020-04-23T11:04:12+5:302020-04-23T11:04:54+5:30

या पाच बाधित रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्यातील  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 115 वर पोहोचली आहे.  

Coronavirus: 5 more positive in Malegaon, total 115 corona infected patients in the district | Coronavirus: मालेगाव येथे आणखी 5 जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण 115 कोरोना बाधित रुग्ण

Coronavirus: मालेगाव येथे आणखी 5 जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण 115 कोरोना बाधित रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात  मालेगाव येथे आणखी 5 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे मालेगावमधील बाधित रुग्ण संख्या 101 वर पोहोचली आहे.  मालेगाव तालुका हा शंभरी पार करणारा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. या शिवाय कोरोनामुळे एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व मालेगावतीलच आहेत.

आज सकाळी 5 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. या पाच बाधित रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्यातील  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 115 वर पोहोचली आहे.  यात मालेगाव शहरातील 101रुग्ण असून  नाशिक शहरातील 10 रुग्ण आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळले आहेत. आता पर्यंत 2 रुग्ण बरे झाले आहेत. यात जिल्ह्यातील निफाड येथे प्रथम आढळलेला एक बाधित आणि नाशिक शहरातील एका बधिताचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: 5 more positive in Malegaon, total 115 corona infected patients in the district