कोरोनामुक्त डॉक्टरांचे लोहोणेरकरांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:40 IST2021-05-10T23:45:15+5:302021-05-11T00:40:31+5:30
लोहोणेर : गावातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व व स्वतःला मधुमेह फसारखा आजार असतानाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत सोमवारी सेवेत पूर्ववत हजर झाल्याने लोहोणेरकरांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

कोरोनामुक्त डॉक्टरांचे लोहोणेरकरांकडून स्वागत
ठळक मुद्देजिद्दीने मात करत ते आपल्या कुटुंबात दाखल झाले.
लोहोणेर : गावातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व व स्वतःला मधुमेह फसारखा आजार असतानाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत सोमवारी सेवेत पूर्ववत हजर झाल्याने लोहोणेरकरांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
लोहोणेर गावात कोरोनाने थैमान घातले असताना व स्वतः मधुमेही रुग्ण असतानाही येथील विलगीकरण कक्षातील अथवा घरी उपचार घेत असलेल्या कोरोनाबधितांची सेवा करणाऱ्या डॉ. आहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावर जिद्दीने मात करत ते आपल्या कुटुंबात दाखल झाले. त्यामुळे लोहोणेर येथील नागरिकांच्या वतीने डॉ. आहिरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.