शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुने नाशिकनंतर आता वडाळागावातही कोरोनाची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 14:32 IST

आलिशान सोसायटीमधील संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांनाही रुग्णवाहिकेतून क्वारंटाइन सेंटरला हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८४५वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आला

नाशिक : शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. शुक्रवारी महापालिका हद्दीतील जुने नाशिक, गोसावीवाडी, नाशिकरोड आणि दसक-पंचक जेलरोड या भागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यानंतर आज मंगळवारी (दि.१९) दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील रजा चौकभागातील आलिशान सोसायटीमधील एक ४५वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपुर्ण परिसर ‘कन्टेन्मेंट झोन’ करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहचली आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वडाळागाव परिसरात सुरूवातीपासूनच काही प्रमाणात लॉकडाउनबाबत उदासिनता दिसून येत होती. सुरूवातीला रजा चौकात भरणाºया भाजीबाजारात ‘डिस्टन्स’चे तीनतेरा झालेले दिसून आले. यामुळे येथून हा भाजीबाजार महापालिका व पोलीस प्रशासनाने थेट वडाळा चौफुलीजवळील मोकळ्या पटांगणात हलविला. त्यानंतर पंधरा दिवसांनी रजा चौक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते सील केले गेले आहे. तसेच वडाळागावात येणारा मुख्य रस्तादेखील जामा गौसिया मशिदीपासूनच बंद करण्यात आला आहे. एकूणच खंडेराव महाराज चौक, वडाळा पोलीस चौकी, जय मल्हार कॉलनी, रजा चौक, झिनतनगर, गणेशनगर हा सगळा परिसर आलिशान सोसायटीपासून अगदी जवळ आहे. यामुळे हे संपुर्ण क्षेत्र प्रतिबंधित झोन म्हणून सील केले आहे.सकाळी अकरा वाजेपासूनच इंदिरानगर पोलीसांचा फौजफाटा, मनपा शहरी आरोग्य विभागाचे पथक, तीन रुग्णवाहिका, जंतुनाशक फवारणी करणारे ट्रॅक्टर, कर्मचारी असा सगळा लवाजमा रजा चौकात येऊन धडकला. या संपुर्ण भागात पोलिसांकडून उद्घोषणा करण्यास सुरूवात झाली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.या भागातील संपुर्ण गल्लीबोळात काही वेळेतच शुकशुकाट दिसून आला. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्ये बसणे पसंत केले. यामुळे रस्ते ओस पडले होते.दरम्यान, आलिशान सोसायटीमधील संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील काही लोकांनाही रुग्णवाहिकेतून क्वारंटाइन सेंटरला हलविण्यात आले आहे.जुने नाशिक, वडाळागाव दाट लोकवस्तीत कोरोनाने प्रवेश करू नये, असे प्रत्येक नाशिककराला वाटत होते; मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपकर् ात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला जुन्या नाशकात कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ते मुंबई या मार्गावर ट्रकमधून कांदा वाहून नेणारा व वडाळागावात राहणारा ट्रकचालकदेखील पॉझिटिव्ह आल्याने भीती व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस