द्यानेत कोरोनाचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:49 IST2020-06-06T20:30:21+5:302020-06-07T00:49:07+5:30
मालेगाव शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच द्याने भागात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात द्यानेतील दहा पैकी सहा बाधीत मिळून आले आहेत. आज सकाळी नऊ वाजता ३६ जणांचे तपासणी अहवाल आले. त्यात दहा बाधीत मिळून आले, तर २६ अहवाल निगेटिव्ह होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून मनपातर्फे प्रभाग क्र मांक दोन अंतर्गत वार्ड क्र मांक सहामध्ये प्रभागात स्वच्छता मोहीम राबविताना कर्मचारी.
ठळक मुद्देदहा पैकी सहा बाधित । २६ जणांचे अहवाल निगेटिव्ह
मालेगाव : शहरात कोरोना नियंत्रणात येत असतानाच द्याने भागात मात्र कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात द्यानेतील दहा पैकी सहा बाधीत मिळून आले आहेत. आज सकाळी नऊ वाजता ३६ जणांचे तपासणी अहवाल आले. त्यात दहा बाधीत मिळून आले, तर २६ अहवाल निगेटिव्ह होते.
यात दत्त नगरातील २३ वर्षी महिला, सोयगावची ३६ वर्षीय महिला, द्यानेतील १३ वर्षांचा मुलगा, ११ वर्षीय मुलगी, आठ वर्षांचा मुलगा ६0 वर्षांची महिला, १६ वर्षीय मुलगी, १४ वर्षाचा मुलगा बाधीत मिळून आला. याशिवाय शहरातील ११ वर्षाचा मुलगा आणि २९ वर्षीय महिला बाधीत मिळून आली.