कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढवली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:36+5:302021-06-26T04:11:36+5:30
कोरोनाची दुसरी लाट नाशिककरांसाठी अत्यंत भयावह ठरली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत कोरोनाचा कहर झाल्यानंतर तर नागरिकांना ऑक्सिजन बेडदेखील मिळणे मुश्कील ...

कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढवली चिंता
कोरोनाची दुसरी लाट नाशिककरांसाठी अत्यंत भयावह ठरली होती. मार्च-एप्रिल महिन्यांत कोरोनाचा कहर झाल्यानंतर तर नागरिकांना ऑक्सिजन बेडदेखील मिळणे मुश्कील झाले होते. अनेकांचे तर बेडअभावी बळी गेले. त्यानंतर हे दोन्ही महिने अत्यंत कठीण काळ होता. मे महिन्यात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर बाधितांची संख्या कमी होऊ लागली. त्याचबरोबर राज्य शासनाने बाजारपेठा आणि अन्य ठिकाणचे निर्बंध शिथिल केले. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दी होऊ लागली. या गर्दीमुळे कोरोना पुन्हा वाढेल काय? अशी चर्चा असतानाच आता डेल्टा प्लसचे संकट घोंघावू लागले आहे. नाशिक जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी नजीकच्या जळगाव जिल्ह्यात एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यात यासंदर्भात दक्षता घेण्यात येत आहे.
इन्फो..
जिल्ह्यात दररोज दीड हजार टेस्टिंग सुरू
- कोरोना चाचणीचे प्रमाण कमी होत असले तरी डेल्टा प्लसमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवण्यात आले असून, साधारणत: दीड हजार चाचण्या रोज केल्या जात आहेत.
- कोरोनाबाधितांचे म्हणजेच पॉझिटिव्ह रुग्णांचे पाच टक्के सॅम्पल रोजच राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत.
- कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नव्या नव्या विषाणूंमुळे अधिक काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यात पुन्हा खबरदारी
- डेल्टा प्लसमुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
- नाशिक जिल्ह्यात वीकेण्ड लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.
- बाजारपेठांमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. ४ वाजता दुकाने बंद करण्यात येणार आहेत.
- संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येेणार आहे. तशा सूचना महापालिका, नगरपालिकांसह अन्य यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
इन्फोग्राफ
कोरोनाचे एकूण रुग्ण - ३,९३,६६४
बरे झालेले रुग्ण - ३,८२,८७६
उपचार घेत असलेले - २५६४
बळी - २५६४
गृह विलगीकरण - १२९२