कोरोनायोद्ध्यांचा म्हसरूळ येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST2021-06-04T04:12:40+5:302021-06-04T04:12:40+5:30

जंगलीदास महाराज सभागृहात शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर व घंटागाडी कामगारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभा समन्वयक विशाल ...

Coronary warriors felicitated at Mhasrul | कोरोनायोद्ध्यांचा म्हसरूळ येथे सत्कार

कोरोनायोद्ध्यांचा म्हसरूळ येथे सत्कार

जंगलीदास महाराज सभागृहात शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर व घंटागाडी कामगारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभा समन्वयक विशाल कदम यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला सुनील बागुल, शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे, वैभव ठाकरे, सचिन मराठे, गणेश बर्वे, विभागप्रमुख संजय पिंगळे, विक्रम खरोटे, महिला आघाडीप्रमुख ज्योती देवरे, स्वाती पाटील, सविता म्हस्के प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील रक्त तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उपस्थित रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. मयूर निकम, शाहरूख पठाण, फिरोज शेख, किरण मोराडे, अविनाश सूर्यवंशी, मोहन पाटील, सुरेश सोनवणे, अभिषेक वाघमारे, गणेश पगारे, राज मराठे, जयराम चव्हाण, यश वाघ, प्रवीण जाधव उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार

कोरोनायोद्ध्या म्हणून घंटागाडी कामगारांचा सत्कार करण्यात आला. त्यात नारायण कराडे, संतोष पाळदे, धर्मा काळे, राजू खाडे, सोमनाथ अस्वले, भगीरथ सकट, सुनील भैरवा, योगेश गांगुर्डे, करण रोकडे, प्रभाकर सोनवणे, सुनील शिंदे, राजू शिंदे, विजय पवार, मनोज हिरे, सुनील गरड, सिकंदर धोत्रे, अनिल चव्हाण, नाना साळवे, राजेंद्र कोळी, गोरख अहिरे, दीपक साळवे, बबन हिरे आदींचा समावेश होता.

Web Title: Coronary warriors felicitated at Mhasrul