शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

कोरोनाच्या ‘भयपर्वा’त 'या' ठिकाणी तब्बल पावणे 5 लाख नागरिक बाधित; ग्रामीणमध्ये सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 7:13 PM

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून ...

नाशिक - जिल्ह्यातील बळींच्या संख्येने कोरोनाच्या प्रारंभाच्या तारखेपासून आतापर्यंत तब्बल ४ लाख ७६ हजार २ इतके नागरिक जिल्ह्यात बाधित आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील १२ नागरिकांपैकी १ नागरिक एकदा तरी बाधित झाल्याची अधिकृत नोंद आहे. तर कोरोनाचा पहिला बळी नाशिक जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० या दिवशी गेला. तेव्हापासून आतापर्यंतच्या २ वर्षांच्या कालावधीत ८ हजार ९०० बळींची अधिकृत नोंद झाली आहे. तरी अनधिकृत किंवा जे भीतीपोटी किंवा रुग्णालयेच उपलब्ध नसल्याने बळी गेलेल्यांच्या संख्येबाबत तर अद्यापही संभ्रम कायम आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार २ रुग्ण बाधित, तर ४ लाख ६७ हजार ८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्या तारखेला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला, त्याच्या एक दिवस अगोदर अर्थात २८ मार्चला जिल्ह्यात आता कोरोना उपचारार्थी संख्या अवघी १५, तर प्रलंबित अहवालांची संख्या केवळ ६६ आहे. आतापर्यंतच्या बळींच्या संख्येचे वर्गीकरण ३ भागात केल्यास पहिले ३ हजार बळी होण्यासाठी ३७५ दिवस म्हणजे जवळपास एक वर्षभराहून अधिक कालावधी गेला होता. तर त्यानंतरचे ३ हजार बळी अवघ्या ५४ दिवसात म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत गेले आहेत. नाशिकसाठी मार्च २०२१, एप्रिल आणि मे २०२१ हे तीन महिने सर्वाधिक घातक ठरले. त्यातही एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, त्याच काळादरम्यान गेलेले शेकडो बळी पोर्टलवर अपलोडच केले गेले नसल्याने जून महिन्यात जेव्हा त्यांची नोंदणी झाली, त्यानंतर ५ ते ८ हजार बळींचा टप्पा जूनच्या अवघ्या २ आठवड्यात पूर्ण झाला होता.

सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये

जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या अगदी प्रारंभीच्या काळात मालेगाव भागात वेगाने बळी जात होते. त्यानंतर नाशिक शहरातील बळींच्या संख्येत ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये प्रचंड वेगाने वाढ झाली. तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ आणि मे २०२१ या महिन्यात नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळी प्रचंड वेगाने वाढले होते. त्यामुळे नाशिक ग्रामीणचे बळी ४३०४, नाशिक मनपा क्षेत्रात ४१०५, मालेगाव मनपा क्षेत्रात ३६४, तर जिल्हाबाह्य १२६ जणांचा बळी गेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस