मालेगावी २२५ लाभार्थ्यांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:14 IST2021-01-19T20:41:55+5:302021-01-21T01:14:55+5:30
मालेगाव : महापालिका व सामान्य रुग्णालय मंगळवारी पुन्हा कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ५०० लाभार्थ्यांपैकी सुमारे २२५ लाभार्थ्यांनी कोविडची लस घेतली.

मालेगावी २२५ लाभार्थ्यांना कोरोना लस
गेल्या शनिवारी लसीकरणास प्रारंभ झाला आहे. शहरातील सोयगाव नागरी आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र रमजानपुरा नागरी आरोग्य केंद्र, कॅम्पातील निमा व सामान्य रुग्णालय लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. आठवड्यातून चार दिवस लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.