आरोग्य भागातील १०० कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 18:25 IST2021-01-19T18:24:48+5:302021-01-19T18:25:40+5:30
लोहोणेर : कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून ऐन कोरोना काळात जीवावर उदार होऊन ज्यांनी कोरोनायोद्धा म्हणून काम केले, अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सत्र आयोजित केले होते.

कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतांना आरोग्यसेवक धनराज सुर्यवंशी.
लोहोणेर : कोरोना महामारीला आळा बसावा म्हणून ऐन कोरोना काळात जीवावर उदार होऊन ज्यांनी कोरोनायोद्धा म्हणून काम केले, अशा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१९) कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड १९ लसीकरण सत्र आयोजित केले होते. यावेळी आरोग्य भागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. देवळा तालुक्यातील खालप येथील रहिवाशी व सध्या दळवट प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गत हतगड येथे कार्यरत असलेले आरोग्यसेवक धनराज सुर्यवंशी यांनी स्वतःला कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. कोरोना प्रतिबंधक लस घेणारी देवळा तालुक्यातील ते पहिलीच व्यक्ती ठरली.
लसीकरणानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. कोरोना लस अगदी सुरक्षित आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्यसेवक सुर्यवंशी यांनी केले आहे.