विठेवाडीत कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 23:35 IST2021-08-09T23:32:45+5:302021-08-09T23:35:15+5:30

लोहोणेर : ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन देवळा तालुक्यातील दौलतराव आहेर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, विठेवाडी येथे साजरा करण्यात आला.

Corona vaccination in Vithewadi | विठेवाडीत कोरोना लसीकरण

विठेवाडीत कोरोना लसीकरण

ठळक मुद्देबिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन विठेवाडी येथील शेतकरी सुनील निकम यांच्या हस्ते

लोहोणेर : ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन देवळा तालुक्यातील दौलतराव आहेर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा, विठेवाडी येथे साजरा करण्यात आला.

प्रथमत: बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन विठेवाडी येथील शेतकरी सुनील निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कोरोना लसीकरण करण्यात आले.

यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जे. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी. बी. देवरे, खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहायक संजय कुंभार्डे, विठेवाडी येथील आरोग्य सेवक संजय भामरे, भऊर येथील आरोग्य सेवक संतोष शेरे, सावकी येथील आरोग्य सेवक दादा शेवाळे, विठेवाडी येथील उपकेंद्राच्या आरोग्य सेविका तनुजा बोरसे, अधीक्षक प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Corona vaccination in Vithewadi