कोरोनामुळे धान्यापासून वंचित ठेवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST2021-03-13T04:25:57+5:302021-03-13T04:25:57+5:30
नाशिक रोड : कोरोना महामारीमुळे अनेक कामगार, मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांना शासकीय स्वस्त धान्य योजनेपासून वंचित ठेवू नये, ...

कोरोनामुळे धान्यापासून वंचित ठेवू नये
नाशिक रोड : कोरोना महामारीमुळे अनेक कामगार, मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांना शासकीय स्वस्त धान्य योजनेपासून वंचित ठेवू नये, न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानातून अल्पदरात धान्य दिले जाते. काही लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक झालेले नसल्याने चालू मार्च महिन्यापासून त्यांना रेशनच्या धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. उच्च न्यायालयाने २०१६ साली आधार क्रमांक व बॅंक खाते संलग्न करताना उपलब्ध न केल्यास स्वस्त धान्य दुकानदाराचा कोटा कमी करु नये, अशी सूचना केली आहे. त्याचे पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर चव्हाण, धोंडीराम बोडके, संतोष ठाकूर, हेमंत परदेशी, भरत परदेशी आदींच्या सह्या आहेत.