कोरोना पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत निर्बंध लादल्याने सार्वजनिक कार्यक्रम करता येणार नाही, असे शासनाचे आदेश असल्याने सार्वजनिक उत्सव साजरे करणारी मंडळे द्विधा मन:स्थितीत सापडली आहेत. विशेष म्हणजे शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्यास कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनीदेखील या वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र गोवऱ्या विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
इन्फो===
उल्लंघन झाल्यास कारवाई
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व सांस्कृतिक तसेच गर्दी होईल अशा कार्यक्रमांना ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. सण साजरे करण्यासाठी नियमावली केली असली तरी त्याचे उल्लंघन झाल्यास आयोजकांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
- अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक