जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:44+5:302021-06-25T04:12:44+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्णवाढीचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी डेल्टा प्लसच्या रुपाने नवीन आव्हान समोर असल्याने ...

Corona restrictions remain in place in the district | जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्णवाढीचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी डेल्टा प्लसच्या रुपाने नवीन आव्हान समोर असल्याने सध्या तरी कोरोनाचे निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी पोर्टलवर ५८ बळी अपडेट करण्यात आले असून बाधितांमध्ये २६३ ची वाढ झाली असून २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीत कडक संचारबंदीचे पालन करण्यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच डेल्टा प्लस या विषाणूचा फैलाव हा गर्दीच्या ठिकाणी अधिक होत असल्याने पर्यटनस्थळी आणि अन्य कोणत्याही ठिकाणी गर्दी टाळण्याबाबत दक्षता घेेण्याचे आवाहनदेखील पालकमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, सलग तिसऱ्या गुरुवारीदेखील पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. काल अपडेट करण्यात आलेल्या ५८ बळींमध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील २१, तर नाशिक ग्रामीणच्या ३७ बळींचा समावेश आहे. त्याशिवाय गुरुवारी प्रत्यक्षात नोंद झालेल्या चार बळींमध्ये नाशिक मनपाचे दोन आणि नाशिक ग्रामीणच्या दोन बळींची नोंद करण्यात आली आहे. या पोर्टलवरील बळींमुळे आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ८,१७२पर्यंत पोहोचली आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पुन्हा ११००वर

जिल्ह्यातील प्रलंबित अहवाल संख्या पुन्हा अकराशेहून अधिक वाढून ११२३ पर्यंत पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ४६७ असून, नाशिक मनपाचे ३४२, तर ३१४ मालेगाव मनपाचे आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.२९ आहे.

पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांवर

जिल्ह्यात गत आठ ते दहा दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट साधारणपणे दीड टक्क्यांच्या आसपास होता. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी पॉझिटिव्हिटी रेट अचानकपणे वाढून ३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये अचानकपणे जवळपास दुपटीने वाढ झाल्याने हा दर चिंतेत भर घालणारा ठरणार आहे.

आठवडाभरातील बाधित रुग्णसंख्या

१७ जून - १५८

१८ जून - १९८

१९ जून - ११४

२० जून - १३६

२१जून - १०६

२२ जून- १८३

२३ जून- ३३८

२४ जून- २६३

Web Title: Corona restrictions remain in place in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.