Corona report of individuals at Lohoner positive | लोहोणेर येथे व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

लोहोणेर येथे व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

ठळक मुद्देपाच दिवसांसाठी दि. २ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू लागू

लोहोणेर : येथे तब्बल आठ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारपासून दि.२८) पाच दिवसांसाठी दि. २ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनाश्यक सेवावगळता गुरुवारी येथील सर्वच व्यवहार सकाळपासूनच बंद करण्यात आले. लोहोणेर गावात रविवारी (दि. २७) दोन वर्षाच्या बालिकेसह एकूण आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोहोणेर गावात भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांनी मास्क लावावे, सॅनिटायझर वापरावे, साबणाने हात धुवावे व सोशल डिस्टन राखावे व पाच दिवस पाळण्यात येत असलेल्या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. (२८ लोहोणेर १)

Web Title: Corona report of individuals at Lohoner positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.