वडाळ्यातही आढळला कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:10 IST2020-05-19T23:48:56+5:302020-05-20T00:10:22+5:30
शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.

वडाळ्यातही आढळला कोरोना रुग्ण
इंदिरानगर : शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या वडाळा गावठाणमधील एका सोसायटीमधील एक ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सुदैवाने मागील आठवडाभरापासून ही कोरोनाबाधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे.
शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून, नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. बाधिताच्या घराच्या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते सील केले गेले आहे. तसेच वडाळागावात येणारा मुख्य रस्तादेखील जामा गौसिया मशिदीपासूनच बंद करण्यात आला आहे. एकूणच
खंडेराव महाराज चौक, वडाळा
पोलीस चौकी, जय मल्हार कॉलनी, रजा चौक, झिनतनगर, गणेशनगर हा सगळा परिसर प्रतिबंधित झोन म्हणून सील केले आहे.