शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आयुष्यच उसवले, टाके घालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:51 IST

चांदोरी : उन्हाळ्याचे दिवस आले की आनंद वाटतो. तापमान वाढत असतानाही आम्हाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. दिवस रात्र ...

चांदोरी : उन्हाळ्याचे दिवस आले की आनंद वाटतो. तापमान वाढत असतानाही आम्हाला काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. दिवस रात्र एक करून या दिवसांत कामाला अधिक महत्त्व देतो. या दिवसात झालेल्या कमाईतूनच वर्षभराचा खर्च निघतो, मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. लग्न सराई निघून चालली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. कोरोनाने सारे आयुष्यच उसवले, आता टाके घालायचे कसे, असा प्रश्न टेलरिंग अर्थात शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना पडला आहे.खेडोपाडी टेलरिंगचा व्यवसाय करणारे अनेकजण आहेत. विशेषत: असंख्य महिला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शिवण कामाचा पर्याय निवडतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. रेडीमेडच्या जमान्यात आजही बहुतांश नागरिकांचा कपडे आपल्या मनाप्रमाणे शिवून घेण्याकडे कल असतो. लग्नसराईत तर शिवणकामाला अधिक गती प्राप्त होऊन त्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाने घात केला आणि लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक संकट अधिक गडद होत गेले. विविध व्यवसाय अडचणीत सापडले. त्यातून टेलरिंग व्यवसाय सुटला नाही. गावापासून तर शहरापर्यंत सर्वच टेलर काम करणाºया कारागिरांच्या मशीन थांबल्या आहेत. कापड दुकाने बंद असल्याने टेलरिंंगच्याही दुकानावर त्याचा परिणाम झालेला आहे. अनेक कारागीर हे हातावर पोट भरणारे आहेत. कपड्यांना अल्टर करणे, पडदे शिवणे, काजे-बटण करणे, इस्त्रीकाम करणे अशा प्रकारची कामे करुन उदरनिर्वाह चालवित असतात, परंतु आता हाताला कामच नसल्याने कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा, अशा पेचात टेलरिंग काम करणारा कारागीर वर्ग सापडला आहे.---------------------------------------टेलरिंग व्यवसायाचा उन्हाळ्यामध्येच सीझन असतो. यावर्षी मात्र सगळंच बंद आहे. दुकान भाडे, वीजबिल, कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा असे अनेक प्रश्न पडले आहे. यासोबतच घरगुती व्यावसायिकांचे तर मोठे हाल सुरू आहे.- मनोज वटारे, टेलर व्यावसायिक, चांदोरी

टॅग्स :Nashikनाशिक