येवल्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 00:59 IST2021-10-06T00:58:31+5:302021-10-06T00:59:47+5:30

येवला तालुक्यातील सात संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. ५) पॉझिटिव्ह आले आहेत

Corona killed three in Yeola | येवल्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

येवल्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

येवला : तालुक्यातील सात संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी, (दि. ५) पॉझिटिव्ह आले आहेत, तर अंगणगाव, धुळगाव, चिचोंडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण तीन बाधितांचा बळी गेला आहे. बाधितांमध्ये तालुक्यातील एरंडगाव येथील पाच, चिचोंडी व बाभुळगाव येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत २८८ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,०८६ झाली असून, यापैकी ५,७११ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्यस्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ८१ इतकी आहे.

Web Title: Corona killed three in Yeola