इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:47 IST2020-06-06T20:37:59+5:302020-06-07T00:47:32+5:30
इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील नवा बाजार एका ५६ वर्षीय इसम कोरोना बाधित आढळला आहे शहरात प्राशासन खडबडून जागी झाली.

इगतपुरी शहरात कोरोनाचा शिरकाव
इगतपुरी : शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील नवा बाजार एका ५६ वर्षीय इसम कोरोना बाधित आढळला आहे शहरात प्राशासन खडबडून जागी झाली.
सदर इसम हा नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून उपचार घेत होता
तेथे त्याची चाचणी केली असता सदर रु ग्ण कोरोना बाधित आढळला. अशी माहिती समजताच तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड - पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी स्वरूपा देवरे तातडीने नवा बाजारात पाहणी करून खबरदारी म्हणून हा परिसर ५० मीटर पर्यंत चारही बाजूंनी सीलबंद करण्यात आला असून कोरोना बाधित रु ग्णाच्या
चार व्यक्तींना त्विरत भावली येथील इंग्लिध मिडीयम निवासी शाळेत कोरोंटाईन करण्यात आले आहे.
नागरिकांनी खबदारी म्हणुन मास व फिजिकल डिस्टन्स चे पालन करावे सतर्क राहावे.असे आवाहन व मुख्याधिकारी निमला गायकवाड यांनी केले आहे.