मनमाड महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:25 IST2020-07-08T14:15:32+5:302020-07-08T14:25:33+5:30
मनमाड: शहरातील एफसीआय रोडवर असलेल्या महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हे कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनमाड महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
मनमाड: शहरातील एफसीआय रोडवर असलेल्या महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हे कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महावितरणचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने महावितरणचे कार्यालय तीन दिवस बंद राहणार आहे. या कार्यालयात तक्र ार निवारण केंद्र असून हे केंद्रदेखील तीन दिवस बंद राहणार आहे .फक्त वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यालय सुरू राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असा फलक महावितरण च्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. येथील एफसीआय रोडवर महावितरणचे कार्यालय आहे . येथे विद्युत जनित्र आणि हक्कांच्या तक्र ारींचे निवारण आदी विविध कामे होतात. पण आता कार्यालय तीन दिवस बंद असल्याने वीज बिलांचे तक्र ार निवारण करण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.