मनमाडला रेल्वे कारखान्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:47 IST2021-03-16T21:46:48+5:302021-03-17T00:47:21+5:30
मनमाड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोनाबाधित आढळून येत असताना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता रेल्वेच्या कारखान्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ८ ते १० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कारखान्यातील कामकाज बंद ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनमाडला रेल्वे कारखान्यात कोरोनाचा शिरकाव
मनमाड : शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोनाबाधित आढळून येत असताना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांपाठोपाठ आता रेल्वेच्या कारखान्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ८ ते १० कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कारखान्यातील कामकाज बंद ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या मनमाड शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८६ झाली आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यानंतर रेल्वेच्या कारखान्यातही आठ ते दहा जणांना लागण झाल्यामुळे कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हा ब्रिटिशकालीन कारखाना असून या ठिकाणी रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्ट यासह इतर साहित्य तयार केले जातात. अन्य कामगारांना संसर्ग होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.