शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

कोरोना इफेक्ट : ...आता कोर्टाच्या तारखेसाठीही करावी लागणार प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 17:58 IST

नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे.

ठळक मुद्देपक्षकार, वकील यांनाही न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहनन्यायालयीन कामकाज तीन तास

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयांमध्येही कामकाजाची वेळ, कर्मचारी संख्या कमी करण्यात आली आहे; मात्र तरीही पक्षकारांची न्यायालयात गर्दी कायम असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी नवे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार नियमित प्रकरणांमध्ये पक्षकारांना चार आठवड्यानंतरची तारीख दिली जाणार आहे. तसे नवीन प्रकरणांचीही नोंदणी प्रक्रिया कायम सुरू राहणार आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांनुसार आता न्यायालयीन कामकाज तीन तास तर न्यायालयाचे कार्यालयीन कामकाज चार तास सुरु आहे. गेल्या चार दिवसांपुर्वीच न्यायालयांमधील कामकाजाची वेळ मर्यादित करण्यात आली. याबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्याही आता कमी करण्यात आली आहे. पक्षकार, वकील यांनाही न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले. तरीदेखील न्यायालयात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वाघवसे यांनी पुढचा निर्णय घेत शनिवारी (दि.२१) नवे परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे. तसेच २४ आणि २७ मार्च रोजी किमान न्यायालयांद्वारे फक्त रिमांड व अत्यंत तातडीचे कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (दि.२३) न्यायालयात केवळ न्यायाधीश व कर्मचारी यांच्या व्यतिरीक्त कोणाचीही हजेरी बंधनकारक नसल्याचेही वाघवसे यांनी पत्रिपत्रकात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य