कोरोना मृत्यू शून्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:29 IST2022-03-03T01:29:21+5:302022-03-03T01:29:37+5:30

जिल्ह्यात बुधवारी (दि. २) नवीन बाधितांच्या संख्येत १७ ची भर पडली असून २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने जिल्ह्यातील बळींंची संख्या ८,८९६ वर कायम राहिली आहे.

Corona death zero! | कोरोना मृत्यू शून्यावर !

कोरोना मृत्यू शून्यावर !

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) नवीन बाधितांच्या संख्येत १७ ची भर पडली असून २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने जिल्ह्यातील बळींंची संख्या ८,८९६ वर कायम राहिली आहे.

जिल्ह्यात सुमारे दीड महिन्याने पुन्हा कोरोेना बळी पूर्ण शून्यावर गेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या ३०३ पर्यंत कमी झाली असून प्रलंबित अहवालांची संख्या ६२८ आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हिटी रेटमध्येही मोठी घट आली असून ते प्रमाण ०.५६ टक्क्यांवर आले आहे. तर कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर आले आहे.

Web Title: Corona death zero!