शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे फुलशेती उत्पादकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:40 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील तीन ते चार वर्षांपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता फुलशेती उत्पादकांचीही कोंडी केली आहे. शेतात मोठ्या कष्टाने फुलवलेल्या टवटवीत फुलांना मागणीअभावी फेकून देण्याची वेळ आली असून, भांडवलासाठी घेतलेले बँकांचे कर्ज थकल्याने चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देबँकांचे कर्ज थकले, फुले फेकून देण्याची वेळ

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील तीन ते चार वर्षांपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता फुलशेती उत्पादकांचीही कोंडी केली आहे. शेतात मोठ्या कष्टाने फुलवलेल्या टवटवीत फुलांना मागणीअभावी फेकून देण्याची वेळ आली असून, भांडवलासाठी घेतलेले बँकांचे कर्ज थकल्याने चिंतेत भर पडली आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी आपल्या शेतात प्रत्येक हंगामात नवनवीन प्रयोग करताना विविध फळभाज्या, तसेच फुलशेती करण्यावर भर देत असतात. कोकणगाव येथील शिवाजी शेळके यांनी आपल्या एक एकर शेतात गुलाब शेतीचे पॉलिहाउस तयार केले होते. कोरोनाचा संसर्ग नव्हता तोपर्यंत गुलाब शेतीतून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत होते. त्यामुळे भांडवलासाठी विविध बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अडचण येत नव्हती; परंतु गेल्या हंगामापासून कोरोना, वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस आदी संकटांमुळे फुलशेती अडचणीत आली. कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्याने पुन्हा एकदा धार्मिक कार्यक्रम, मंदिरे, विविध धार्मिक विधी शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आल्याने फुलांना मागणी नाही. त्यामुळे लाखो रुपयांची टवटवीत फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विविध बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे व संसाराचा गाडा कसा ओढावा, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.फुलशेतीसाठी लाखो रुपये खर्च करूनही हातात काहीच उत्पन्न आले नाही. त्यामुळे सध्या आमच्यावर लाखो रुपयांचे कर्जाचे ओझे झाले आहे. त्यामध्ये वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरूच असल्याने कोंडी झाली आहे.-शिवाजी शेळके, गुलाब फुलशेती उत्पादक, कोकणगाव खुर्द

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी